हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो. .
धूंद वेड्या क्षणात ओथंबून वाहिलो. .
तन मन धनात एकमेकात साठवून राहिलो. .
सवपन दोघांचे बघण्यात मन रंगवून गेलो होतो. .
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
सहवासात प्रेमात उत्कटा होती
विरहा नंतर भेटण्याची ओढही होती.
दुखाच्या छायेत ही प्रेमाने चिंब नहालो होतो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
वेगवेगळे सूर आपले. ...तरीही जुळले होते. .
आयुष्यातले छोटे क्षण तेव्हा फूलले होते. .
बोललो नाही तरी मूकपणाने संवाद साधत होतो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
जगण्यातला दोघांचा अर्थ वेगळा होता. .
तुझ्या माझ्या भावनांना मार्ग मोकळा होता. ..
फक्त एका नजरेने मनाचा ठाव घेत होतो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
हलली असं का वाटतं थोडसं वेगळं. .
सगळे असुनही मन उगाच का होत हळवं..
बोलताना एवढे का आपण औपचारिक होतो. .
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
दोघं मिळून जगताना सारं हरवायला लागलं
तुझं-माझं करताना मी पण वर येवू लागलं..
मी पण सावरताना एकटेपणात हरवून गेलो. .
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
सुंदर असले तरी सगळं वेगळं भासू लागलं..
चांगलं असलं किती तरी वाईट दिसू लागलं
या सगळ्या मूळे एकमेकांपासून दूरावत गेलो...
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
आत्ता मात्र थोडं वेगळं वाटायला लागलं. ..
आपल्यातलं प्रेम आटायला का लागलं. .
बरोबर असूनही आपण रितं का जगायला लागलो..
हाती हात घेऊन, तू आणि मी एकमेकांचे झालो होतो....
Mast gudde.. as always ekdam wrushabh .. khupach chan natya baddal lihile ahe .. keep it up
ReplyDelete