काय कमवायचं काय गमवायचं
आयुष्य असं कि
त्या पुढे नमायाचं II
कधी हसायचं कधी रडायचं
सुखांतिका क्षणी कधी फुलायचं
सुखी क्षणातच मन रमवायचं
आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं …
कधी अडकायचं त्यात गुर्फटायचं
ओझे झाले तर कधी सोडायचं
न उलगडणाऱ्या कोडयात पुन्हा अडकायचं
आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं ….
कधी फसायचं कधी फसवायचं
गोड स्वप्नात मन भुलवायचं
भंगले स्वप्न तरी त्या मागेच धावायचं
आयुष्य असं कि त्या पुढे नमायाच….
कधी वेचायचं कधी फेकायचं
न पेलणारे, ओझं कधी वाहायचं
लागली ठेच तरी पुन्हा उठायचं
आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं…
काय कमवायचं काय गमवायचं ?
कमी अधिकच्या फेऱ्यात का गुर्फटायचं ?
मिळालेल्या आयुष्याच "प्रेमानं"
सोनं करायचं
आयुष्य असं कि त्या पुढे नमायाचं ......
----अश्विनी जोशी
Blogsathi khoop shubhechaa!!.....1998-2000 madhli kavita aahe....athawatiye mala...navin pan aad kar na...i am sure gelya 10 yrs madhe ajun pragalbhata aali asel....karan kharya arthane lagna nantar ayushya navyane umagate!!
ReplyDeleteAny ways....KEEP IT UP!!!